देणगीदार आणि सभासद स्नेहमेळावा
देणगीदार आणि सभासद स्नेहमेळावा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सभासद आणि विविध स्तरांतील देणगीदार यांचा एक स्नेहमेळावा नुकताच म्हणजे रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळात संस्थेच्या रमा-पुरुषोत्तम शैक्षणिक संकुलातील अॅंफीथिएटरमध्ये संपन्न झाला. या मेळाव्यास देणगीदार-सभासदांनी मोठा प्रतिसाद दिला. आनंदीबाई कर्वे शाळेच्या विद्यार्थिनींनी गायिलेल्या आश्रमगीतानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेच्या उपकार्याध्यक्षा श्रीमती …